पहिल्यांदाच आमदार , थेट मुख्यमंत्रिपदी वर्णी, असा आहे रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास

दिल्ली : दिल्लीची विधानसभा निवडणुक चांगलीच गाजली. यावेळी भाजपा आणि आपमध्ये जोरदार सामना रंगताना दिसला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्हीकडून झडल्या जात होत्या. या निवडणुकीमध्ये 'आप'ला पराभवाचा सामना करावा लागला व भाजपने दणदणीत विजय मिळवला.
निवडणुकीतील विजयानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची लोकांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता बघायला मिळाली. शेवटी मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून भाजपाकडून जाहीर करण्यात आले.आज रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .
पहिल्यांदाच आमदार , थेट मुख्यमंत्रिपदावर वर्णी
विशेष म्हणजे रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांची थेट मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली. अनेक दिग्गजांना रेखा गुप्ता यांच्या नावाच्या घोषणेनंतर धक्के बसले. रेखा गुप्ता या अनेक वर्षांपासून भाजपाचे काम करत. मुळ हरियाणाच्या असून रेखा गुप्ता दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबिय दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चाैथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
असा आहे रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता या दिल्ली भाजपच्या महासचिव आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. दिल्लीचा भाजपाचा महत्वाचा चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील नंदगढ गावात झाला. रेखा गुप्ता यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर रेखा गुप्ता यांचे कुटुंब 1976 मध्ये दिल्लीला स्थायिक झाले. त्यावेळी रेखा गुप्ता या फक्त दोन वर्षांच्या होत्या. दिल्लीमध्येच रेखा गुप्ता यांचे प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण झाले. रेखा गुप्ता दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (DUSU) च्या माजी अध्यक्ष आणि सरचिटणीस देखील होत्या.
रेखा गुप्ता यांचे पती कोण ?
रेखा गुप्ता यांच्या पतीचे नाव मनीष गुप्ता आहे. त्यांचे पती एक स्पेअर पार्ट्स व्यावसायिक आहेत. विशेष म्हणजे मनीष गुप्ता यांनी पत्नीला कायमच सपोर्ट केलाय. रेखा गुप्ता यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांचे पती विमा व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांचा निकुंज एंटरप्राइज नावाचा व्यवसायही आहे. रेखा गुप्ता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव हर्षिता आहे, तर मुलाचे नाव निकुंज आहे.