पुष्पा २' चा सलग २० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,केली 'इतक्या' कोटींची कमाई

पुष्पा २' चा  सलग २० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,केली 'इतक्या' कोटींची कमाई

मुंबई: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा २' ने सलग २० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉलिवूड आणि साऊथच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले असून हिंदीत ७०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 

रोज नवनवे रेकॉर्ड

पुष्पा २ रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. विशेष म्हणजे तेलुगू भाषेत बनलेला हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करत आहे. २० व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात अडकला असताना, अभिनेत्याचा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनच्या वेगाने कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता, त्याची गती लवकरच थांबेल असे वाटत नाही.

जगभरात  केले १५५० कोटींचे कलेक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास १५५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात १९ दिवसांत १५२६.९५ कोटींची कमाई केली. तेथील एकूण कमाई २५० कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.