HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Actor Santosh Nalawade Passes Away: धक्कादायक ! 'अप्पी आमची कलेक्टर' फेम संतोष नलावडे यांचं अपघाती निधन

Actor Santosh Nalawade Passes Away: धक्कादायक ! 'अप्पी आमची कलेक्टर' फेम संतोष  नलावडे यांचं अपघाती निधन

मुंबई : मालिका विश्वासाठी धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. टीव्ही मालिका 'अप्पी आमची कलेक्टर' फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचं निधन झालं आहे. संतोष यांचा अवघ्या ४९व्या वर्षी नांदेड येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला.

संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते. नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना काल (सोमवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर वाढे (ता. सातारा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता.

मालिकांसह मराठी चित्रपटांमध्ये केले काम 

संतोष नलावडे यांनी हौशी नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अप्पी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजींद, कॉन्स्टेबल मंजू, लागीर झालं जी यांसारख्या मालिकेतही काम केलं होतं, तसंच त्यांनी विविध मराठी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व शोक व्यक्त करत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.