पोलीस शिपाई चालक पदासाठी लेखी परीक्षा 31 जुलै रोजी

पोलीस शिपाई चालक पदासाठी लेखी परीक्षा 31 जुलै रोजी

कोल्हापूर ,(प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती-२०२२-२३ ची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ५९ पोलीस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणी गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ३१ जुलै रोजी सायं. 4 ते 5.30 या वेळेत स्वामी विवेकानंद महाविदयालय, कोल्हापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

    लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र महाआयटी विभाग, मुंबई यांचेकडून उमेदवाराना पाठविण्यात येणार आहेत. परीक्षार्थीनी परीक्षेच्या वेळे आधी 2 तास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. असे कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांच्याकडून कळविण्यात आले आहे.