प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा

परशुराम घोरपडे / माझा महाराष्ट्र, किणी प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील किणी येथे गेले काही दिवस वारणा धरण व राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊसामुळे वारणा नदी व पंचगंगा नदी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूरस्थिती परिस्थितीचा आणि उपायोजनेचा आढावा घेतला.

२०१९ ला आलेल्या महापुरामध्ये राष्ट्रीय महामार्ग काही दिवस बंद होता. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  प्रांत अधिकारी मोसमी चौगुले-बर्डे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, मंडळ अधिकारी अमित लाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संभाव्य पूर परिस्थितीत महामार्गावर अडकलेल्या प्रवाशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपायोजनांची पाहणी केली. महामार्गालगत असलेल्या किणी हायस्कूल किणी येथे नागरिकांची सोय करण्याच्या दृष्टीकोनातून पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना विभाग देऊन त्या ठिकाणी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. तसेच महामार्ग प्रवाशी त्याचबरोबर नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबत उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा केली.

यावेळी उपसरपंच अशोक माळी, ग्रामपंचायत सदस्य संताजी माने, सादिक महाबरी, दिपक घाटगे,सुगंध समुद्रे, हर्षद पाटील,बंदेनावज मुजावर, ग्रामविकास अधिकारी धनाजी शिंदे, तलाठी आझाद मोमीन मुख्याध्यापक बी. डी.मलगुंडे आदीसह नागरिक उपस्थित होते.