प्राथमिक दूध संस्‍थांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे-अरुण डोंगळे

प्राथमिक दूध संस्‍थांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे-अरुण डोंगळे

कोल्हापूर ता. ०८: शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या १३ प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने प्राथमिक दूध संस्‍था व दूध उत्‍पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार केला असुन प्राथमिक दूध संस्‍था पदाधिका-यांनी संस्था व दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. तसेच संघाच्या विविध योजना सेवासुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेऊन संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार नूतन दूध संस्था प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, सागर माने (कवठेसार), प्रदिप उलागडे (अकिवाट) सचिन पाटील (दोनोळी), शक्ती पाटील (उदगाव), सागर हेरवाड (तेरवाड), सुनिल आळते (दत्तवाड), राजेश खोत (शिवनाकवाडी), सुरेश सावंत (चिंचवाड) व गोकुळचे सहा.दूध संकलन अधिकारी मुकुंद  पाटील, सिनी.विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे तसेच विविध दूध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.