HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून पंधरा हजार रुपये दंड वसूल

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून पंधरा हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बाजार गेट परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी आज करण्यात आली. यावेळी बाजार गेट परिसरातील अग्रवाल कटलरी, महालक्ष्मी कटलरी व इंडिया कटलरी या व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान अंदाजे 200 किलो प्लॅस्टीकचा साठा आढळून आल्याने यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड करुन 3 व्यापाऱ्यांकडून 15 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी राबविण्यात येत आहे. हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजची ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, मुकादम सुरक्षा सोहनी, वनिता सूर्यवंशी व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी या व्यापा-यसांना येथून पुढे प्लास्टिकचा वापर करु नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे राजारामपुरी परिसरातही एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यामध्ये मिरजकर पोहे सेंटर, सुनील बँगल्स व फ्लॉवर गिफ्ट हाऊस अशा तीन दुकानदारांकडून अंदाजे 20 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरिक्षक महेश भोसले, माधवी मसुरकर, मुकादम व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. 

तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.