वारणा विद्यापीठ व युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार
वारणानगर (प्रतिनिधी) : वारणा विद्यापीठ (महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ) व युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशिया यांच्यामध्ये यांच्यामध्ये मलेशियामध्ये सामंजस्य करार झाला. या करारावर वारणा विद्यापीठाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी,वारणा विद्यापीठाचे रिसर्च इनोवेशन अँड पार्टनरशिप चे डायरेक्टर, डॉ. उमेश देशन्नवर व युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशिया, डॉ. मोहम्मद फडझिल हसन, उपकुलगुरू, रिसर्च इनोवेशन अँड कमर्शिलायझेशन,डॉ. हसलिंडा, विभाग प्रमुख, केमिकल इंजिनिअरिंग यांनी स्वाक्षरी केल्या. करारावेळी, अधिष्ठाता, सेंटर फॉर ग्रॅज्युएट स्टडीज, डॉ. बलबीर सिंग महेंद्रसिंग, डॉ. भजनलाल, डॉ.बावडी अब्दुल्ला उपस्थित होते.
वारणा विद्यापीठामधून डॉ. विलास व्ही. कारजिन्नी व डॉ. उमेश देशन्नवार खास करून सामंजस्य करण्यासाठी मलेशियात उपस्थित होते. या कराराच्या यशस्वीतेबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढणार असून विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी नवनवीन संधी मिळणार आहेत.हा करार विविध शाखांमध्ये एकत्रित संशोधन, शिक्षणाचे आदानप्रदान, विद्यार्थ्यांची अदलाबदल आणि प्राध्यापकांच्या सहकार्याचा समावेश करणार आहे. वारणा विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशियाच्या अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे. तसेच, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशिया विद्यार्थ्यांनाही वारणा विद्यापीठात येण्याची संधी मिळेल