कोयना धरण क्षेत्राकडून सतर्कतेचा इशारा

कोयना धरण क्षेत्राकडून सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६:०० वा कोयना धरणामध्ये एकूण १०३.४० टीएमसी (९८.२४%) पाणीसाठा आहे.

पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ६:०० वा. धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फूट ६ इंच उघडून सांडव्यावरून ३०,९५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणी पातळीत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३३,०५० क्युसेक्स आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.