HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

लिंगायत समाजातील खुल्या वर्गास लाभ द्यावा; समरजितसिंग घाटगे यांचे देवेंद्र फडणवीसना निवेदन

लिंगायत समाजातील खुल्या वर्गास लाभ द्यावा; समरजितसिंग घाटगे यांचे देवेंद्र फडणवीसना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ लिंगायत समाजातील खुल्या वर्गासही द्यावा,अशी मागणी भाजप नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली .

 या निवेदनात असे म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाने लिंगायत समाजातील लोकांच्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याकरीता रू 50 कोटीची तरतुद ही केली आहे. या योजनेतून सध्या लिंगायत समाजातील पोटजाती व इतर मागास वर्गात समावेश असलेल्या लोकांनाच आर्थिक लाभ दिला जात आहे. परंतु लिंगायत समाजातील खुल्या वर्गात समावेश असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील लोक या योजनेपासून वंचित आहेत. हा त्यांच्यावर अन्याय आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महा मंडळांतर्गत मराठा समाजातील सरसकट सर्वांना जसा लाभ दिला जातो तसाच लाभ बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामार्फत आम्हा सर्व लिंगायत बांधवांना मिळावा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन घाटगे यांना दिले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.