बिहारमधील छोटे नागपूर ; कसे झाले नामकरण ?

बिहारमधील छोटे नागपूर ; कसे झाले नामकरण ?

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : नागपूरचे भोसले हे महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर नागपूरकर भोसले संस्थानिकांनी त्याचा विस्तार थेट ओरिसापर्यंत  केला. 

बिहारमध्ये जो छोटा नागपूर नावाचा जो पठार आहे  त्याला हे नाव नागपूरकर राजे रघुजी भोसले संस्थानिकांनी दिले होते. रघुजीनी हा भाग जिंकल्यानंतर बिहारचा तो भाग नागपूरासारखाच सारखा वाटला आणि त्यांनी त्याचा छोटा नागपूर असा उल्लेख केला. आजही ते नामकरण कायम आहे. 

भारतातील पराक्रमी नागपूरकर भोसले साम्राज्याच्या  साम्राज्य विस्ताराच्या राजेशाहीची ओळख दर्शवणाऱ्या अशा खुणा ठिकठिकाणी आजही कायम राहिल्या  आहेत. 

इ.स.1800 हा काळ नागपूरकर भोसल्यांच्या वैभवाचा अत्युच्च काळ समजला जातो.  याकाळात नागपूरकर भोसल्यांची सत्ता उत्तरेस नदीपासून ते दक्षिणेस गोदावरी पर्यंत आणि पश्चिमेस वऱ्हाडपासून ते पूर्व दिशेला पूर्व समुद्रापर्यंत कायम झाली.