बंगळुरु मेट्रो स्टेशनवर बॉयफ्रेंडचे अश्लील चाळे ; डायरेक्ट गर्लफ्रेंडच्या टी-शर्ट मध्येच घातला हात अन् ....

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली मेट्रोमधील अनेक धक्कादायक, अश्लील व्हिडीओ समोर येत असतात. यापैकी अनेक व्हिडीओ तर सार्वजनिक ठिकाणी हे असं कसं करु शकतात असा प्रश्न निर्माण करण्यासारखे असतात. परंतु आता एक धक्कादायक व्हिडीओ भारताची आयटी सीटी असलेल्या बंगळुरुमधील मेट्रो स्थानकामधून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
बंगळुरुची वाटचाल दिल्ली मेट्रोच्या संस्कृतीच्या दिशेने सुरु आहे का? अशा मथळ्याखाली घडलेल्या प्रकरणाचा व्हिडीओ ‘कर्नाटक पोर्टफोलिओ’ नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “सार्वजनिक ठिकाणीवरील हे लज्जास्पद वागणं नम्मा मेट्रो स्थानकावरील असून यामुळे बंगळुरुमधील सभ्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे,” अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.
नेमकं असं काय आहे व्हिडीओमध्ये ?
या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्यासमोरच उभ्या असलेल्या तरुणीच्या टीशर्टमध्ये हात घालताना दिसत आहे. ही तरुणीही त्याला विरोध न करता घडत असलेल्या प्रकारात सहभागी असल्यासारखं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. याबद्दही पोस्टमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. “हे फारच निराशाजनक आणि चिंता करण्यासारखं आहे की काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी या अशा गोष्टी करत आहेत.
घटना आहे तरी कुठली ?
लज्जास्पद अशी ही घटना मादवेरा मेट्रो स्थानकावरील असल्याची माहिती आहे. ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला असून लोक अस्वस्थ झाले आहेत. एक तरुण मुलगा त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर अत्यंत अश्लील कृत करताना दिसत आहे. मेट्रो स्थानकात उभा असताना हा तरुण अश्लील पद्धतीने त्याच्या गर्लफ्रेण्डच्या कपड्यांमध्ये हात घालत असल्याचं दिसत आहे. मेट्रो स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी हे असं कृत्य निंदनीय आहे,” असं या पोस्टमध्ये म्हटल आहे. घडलेल्या या प्रकाराबद्दल अनेकजण संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
“नाती हा पूर्णपणे खासगी विषय असला तरी सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे आणि चुकीचं कृत्य करणे यामध्ये फरक आहे. सार्वजनिक ठिकाणी या दोघांमधील रेषा कधीच ओलांडली जाता कामा नये. याहून धक्कादायक बाब म्हणजे तरुण मुली हे सारं सहन करतात किंवा त्यांच्या जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या अशा गोष्टींना प्रोत्साहन देताना दिसतात. हे असं करण्यात काहीच चुकीचं नसल्यासारखं त्या वागतात. या अशा गोष्टी म्हणजे बोल्डनेस किंवा स्वातंत्र्य नाही तर हा बेजबाबदारपणे, अपमान आणि समाजभान नसल्याचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये या कृत्याचा निषेध पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
‘बंगळुरु हे कायमच विकासात्मक दृष्टीकोन असलेलं मात्र सन्मानजनक संस्कृती जपणारं शहर आहे. हल्ली असे प्रकार सर्रास घडत आहेत. आपल्या शहरांमध्ये कशाप्रकारची मूल्य जोपासली जात आहेत हा प्रश्नच आहे. सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या किमान मर्यादांकडेही का दुर्लक्ष केलं जात हे कळत नाही,’ असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी
“या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई करावी. ही कारवाई सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित, व्यवस्थित आणि एकमेकाबद्दल सन्मान बाळगत कसं आचरण असावं हे दर्शवणारी असावी,” अशी अपेक्षा पोस्टच्या शेवटी व्यक्त केली आहे.