वेतवडे पन्हाळा येथील शाळेत मुख्याध्यापक कडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वेतवडे पन्हाळा येथील शाळेत मुख्याध्यापक कडून अल्पवयीन  मुलीचा विनयभंग

पन्हाळा प्रतिनिधी 

पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथे से एम व्ही नाझरे हायस्कूल असून या ठिकाणी आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. या हायस्कूलमध्ये राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथील दत्तात्रय आनंद जाधव हे मुख्याध्यापक व त्यांची पत्नी सहशिक्षक म्हणून काम करत आहेत. इयत्ता दहावीच्या वर्गाची परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीला दिनांक 17-3- 2023 ते 25-3- 2023 पर्यंत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप वरून मेसेज पाठवणे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक इच्छा तयार करण्याचा प्रकार घडल्याने सदर पीडित मुलीच्या आईने कळे पोलीस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव या शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.