HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मंदिरवाले बाबा हसन मुश्रीफांनी मंदीरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली :स्वाती कोरी

मंदिरवाले बाबा हसन मुश्रीफांनी मंदीरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली :स्वाती कोरी

 आजरा (प्रतिनिधी) :पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा टक्केवारीतील आपल्या दलालांच्या माध्यमातून लाटण्याचा सपाटा लावला आहे. एवढेच नव्हे तर ज्या उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने त्यांना गेल्या पंधरा वर्षांमध्ये विजयी मताधिक्य दिले त्याच मतदार संघाचे श्रध्दास्थान असलेल्या जोमकाईदेवी मंदिर बांधकामातील निधीत भ्रष्टाचार करून त्यांनी टक्केवारी घेतली. स्वतःला "मंदीरवाले बाबा"अशी स्वयंघोषित उपाधी लावून घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी आमची अस्मिता आणि श्रध्दास्थान असलेल्या मंदिरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली.अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली.

     उत्तुर (ता. आजरा)येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

     

 *मुश्रीफ स्वार्थाने अंध झाले आहेत* 

स्वाती कोरी पुढे म्हणाल्या,स्वार्थांने अंध झालेल्या मुश्रीफांनी सरसेनापती संताजी घोरपडे हा खाजगी कारखाना काढला.मात्र हा कारखाना सुरळीत चालण्यासाठी त्यांनी गडहिंग्लज आणि आजरा कारखाना कर्जबाजारी करून त्यांच्या अस्तित्वालाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.परिणामी येथील अनेक भूमिपूत्रांवर बेरोजगार होण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांचे वाटोळे झाले.याचा वचपा येथील जनता या निवडणुकीत मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढेल.

     समरजीतसिंह घाटगे म्हणाले," 

कागल, गडहिंग्लज,उत्तूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले.लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.भयमुक्त लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे. पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले. 

त्यांची सर्वाधिक पाठराखण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे.एक वेळ मला सेवा करण्याची संधी द्या.गडहिंग्लज एमआयडीसीमध्ये गेल्या पंधरा वर्षात त्यांना एकही उद्योग आणता आला नाही. गेली पंधरा वर्षे आयटी पार्क आणण्याचे ते सांगत आहे. त्यांनी मिळवलेली कमाई पाहता आयटी पार्क नव्हे ते स्वतःसाठी इन्कम टॅक्स पार्क आणतील. संविधानाने स्वतःचे मत ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे. या गावातील नेत्यांना जसा कुणाला पाठिंबा द्यायचा अधिकार आहे.त्याप्रमाणे येथील जनतेने सुद्धा त्यांनी मत कुणाला द्यायचे याचा अधिकार संविधानाने दिला आहे. येथील पुढार्‍यांनी आपलं मत ठरवलं आहे तसं येथील जनतेला माझे आवाहन आहे की तुमचे मत कुणाला द्यायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सांगतो तुम्ही अजून भत्त्यावरच आहात कधीही तुम्हाला ते वेजबोर्ड लागू करणार नाहीत.

  स्वागत प्रवीण लोकरे यांनी केले.यावेळी सुरेश ढोणुक्षे, शिवाजी गुरव, नंदकुमार गोरे, अमृता सागर, प्रकाश कुंभार, विठ्ठल उत्तुरकर, संपतराव देसाई, कॉम्रेड शिवाजी मगदूम, चंद्रकांत गोरुले, सुरेश कुराडे,अभिषेक शिंपी, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रा. सुनील शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

सभेस प्रकाश कुंभार, प्रकाश गाडे, संपतराव देसाई, दिनकर जाधव, रणजीत गाडे, संदीप गुरव, धोंडीराम सावंत आदी उपस्थित होते. आभार प्रकाश चव्हाण यांनी मानले.

    *माणसं विकत घेण्याचा पालकमंत्र्यांचा उद्योग* 

        यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा.सुनील शिंत्रे म्हणाले,पालकमंत्री विकासकामांचा डांगोरा पिटत आहेत.मग ऐन निवडणुकीत रात्रीच्या वेळी त्यांना भांडी आणि पैसे का वाटावे,लागत आहेत ? असा सवाल उपस्थित करून आपला कारखाना सुरळीत चालण्यासाठी जिल्हा बँकेतील सत्तेचा गैरवापर करून या परिसरातील कारखाने मोडीत काढले. कंत्राटदारांच्या आडून माणसं विकत घेण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे.त्यांचे हे षडयंत्र आता जनतेला समजले असून या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.