...मग आर .आर .पाटील , विलासराव देशमुख यांचा राजीनामा का घेतला ? संजय राऊत यांचा शरद पवारांना सवाल

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, केवळ सैन्यावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी केली.
राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनाही टोला लगावत विचारले की, जर अमित शाह यांचा राजीनामा नको असेल, तर मग पवारांनी पूर्वी आर.आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा का घेतला होता? त्यांनी याला जनभावनेशी जोडले आणि सांगितले की सरकारच्या चुकांमुळे २७ निरपराध लोकांना जीव गमवावा लागला, त्याचे समर्थन करणे अपराध ठरेल.
याशिवाय रायगडच्या पालकमंत्रिपदावर राऊतांनी आदिती तटकरे यांचे कौतुक केले. त्या संयमी, भ्रष्टाचारमुक्त असल्याचे आणि त्यांचा जिल्ह्याचा चांगला अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाव न घेता भरत गोगावले यांच्यावर त्यांनी टीका केली.