HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महापालिकेच्या आश्वासनानंतर 'आप' रिक्षा संघटनेचा रस्ता रोको मागे

महापालिकेच्या आश्वासनानंतर 'आप' रिक्षा संघटनेचा रस्ता रोको मागे

कोल्हापूर प्रतिनिधी 

कदमवाडीतील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करवाबलागत आहे. आर के कॉर्नर ते भोसलेवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कदमवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना खड्डेमय रस्त्यांमुळे रिक्षा चालवताना अडचणी येत आहेत. खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत या मागणीसाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने कदमवाडी येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

आंदोलनाच्या धसक्याने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत खडी उपलब्ध केली. उपशहर अभियंता रमेश कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन डिपार्टमेंटल निधीतून रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही सुरू केल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे संघटनेचे मार्गदर्शक व 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश गायकवाड, शशांक लोखंडे, उमेश वडर, चिमाजी कोपार्डे, महादेव कांबळे, संदीप जाधव, संजय नलवडे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, विजय हेगडे, मयूर भोसले, अमरसिंह दळवी, समीर लतीफ, दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, सदाशिव कोकितकर, अमोल काळे आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.