मराठा युवकांना 107 कोटींचे कर्ज : अध्यक्ष- एम. पी. पाटील
कागल (प्रतिनिधि) : ज्येष्ठ नेते विक्रमसिंहजी घाटगे यांच्या आशीर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे बैंक अण्णासाहेब पाटील योजनेतून मराठा समाजातील युवकांना १०७ कोर्टीहून अधिक रुपयांचा कर्जपुरवठा करीत राज्यात प्रथम क्रमांकावर आली आहे. असे प्रतिपादन अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केले. येथील श्री राम मंदिर सभागृहात राजे विक्रम सिंह घाटगे को. ऑप. बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
बँकेत जमा झालेली लाडकी बहीणचे ६०० महिलांची रक्कम विनाकपात घरपोच केली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले, प्रकाश पाटील, रवींद्र घोरपडे,
उमेश सावंत, कल्पना घाटगे, अनिल मोरे, बाबासाहेब मगदूम, मुख्य सचिव हरिदास भोसले यांच्यासह बँकेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आप्पासाहेब हुच्चे यांनी स्वागत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी नोटीस वाचन तर रणजित पाटील यांनी आभार मानले.