मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट ..!

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट ..!

मुंबई - राज ठाकरे यांची मंत्री उदय सामंत यांनी आज भेट घेतली. मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असल्याचं पहायला मिळतय. राज्यातील बँकांचे व्यवहार हे मराठीतूनच झाले पाहिजेत अशी मनसेची भूमिका असल्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. साधारणतः एक तास दोघांमध्ये चर्चा झाली. 

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच राज ठाकरेंच्या भेटीला आलेलो आहे. मराठीच्या मुद्द्यावर आमच्यात चर्चा झाली असून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करीन मराठी भाष्येच्या मुद्द्यावर. मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय होतो, याच विषयावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. 

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील तीच भूमिका आहे. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी सर्व समित्यांची बैठक घेऊन यावर  काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ असेही मंत्री सामंत यावेळी म्हणाले.