नामदार चंद्रकांत पाटील वैद्यकीय कक्षाच्यावतीने महिनाभरात 22 लाख निधी वितरीत
कोल्हापूर / प्रतिनिधी
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे गरजू रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधे, शासकीय तसेच सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय मदत दिली जाते. मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
१ जुलै २०२३ ते २७ जुलै २०२३ पर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीतून २० रुग्णांना १९,७०,०००/- सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्ट मुंबई निधीतून ६ रुग्णांना १,३५,०००/- महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेतून ३ रुग्णांना १,९२,०००/- असा एकत्रित २२ लाख ९७ हजार इतका निधी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वैद्यकीय कक्षाच्या मार्फत गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून दिला आहे.
आज कोल्हापूर जिल्ह्यातील मीना बुवा यांना (नवजात बालक), लौकिक यादव (लिव्हर ट्रान्सफर), राहुल तिवडे (ब्लड कॅन्सर), स्नेहा वाघमारे (अपघात विकार), प्रवीण देवेकर (तोंडाचा कॅन्सर), दीपक चव्हाण (मेंदूवरील शस्त्रक्रिया) या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्कम रुपये ७ लाखांच्या (एकत्रित) निधीच्या प्रमाणपत्राचे वितरण भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय कक्षाच्यावतीने राहूल चौगले, प्रथमेश पाटील, आकाश दळवी, हिंदुराव पाटील, विजय पाटील, श्रीधर गुरव यांनी काम पाहिले. यावेळी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.