HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शासकीय वसतीगृह बांधकामाचा आ. प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

शासकीय वसतीगृह बांधकामाचा आ. प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

गारगोटी,( प्रतिनिधी):भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता गारगोटी (फणसवाडी) येथे शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी 17 कोटी या प्रमाणे 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतीगृह निर्माण होणार आहे. या कामाचा शुभारंभ रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार आहे. 

 मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मागसवर्गीय समाजातील युवक-युवती गारगोटी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना राहण्यासाठी चांगल्या पध्दतीची सोय नसल्यामुळे त्यांची अडचण होत होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या सोईकरीता शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मिळावा याकरीता गेली 5 ते 7 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. प्रत्येकी 17 कोटी याप्रमाणे 34 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यानिधीतून गारगोटी (फणसवाडी) येथे बांधण्यात येणारी वसतीगृहे ही सर्व सुविधांनी युक्त, मुला-मुलींसाठी सुरक्षीत अशा पध्दतीने बांधण्यात येणार आहेत. भुदरगड तालुक्याच्या शैक्षणिक कार्यात ही वसतीगृहे महत्वपुर्ण ठरणार असून मागसवर्गीय समाजातील मुला-मुलींच्या तसेच खुल्या प्रवर्गातील मुलां-मुलींच्या उच्च शिक्षणाला यामुळे मोठी चालणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या दोन्ही वसतीगृहांच्या बांधकामाची सुरवात लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.