गव्हर्नमेंट सर्व्हटस बँकेतर्फे 'पद्माराजे' पारितोषिक वितरण

गव्हर्नमेंट सर्व्हटस बँकेतर्फे 'पद्माराजे' पारितोषिक वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सभासदांच्या मुलींसाठी 'पद्माराजे' पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ व ग्राहक मेळाव्याचे १५ सप्टेंबरला शाहू स्मारक भवन येथे आयोजन केले आहे. यासोबतच डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान आयोजित केले असून, अध्यक्षस्थाननी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळचे उपसंचालक दिलीप माने हे भूषवणार आहेत.

वारणा कालवा विभाग, इस्लामपूरचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सभासदांनी नजीकच्या शाखांत १२ सप्टेंबरपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष एम. एस. पाटील यांनी पत्रकातून केले आहे. कला, क्रीडा, साहित्य व इतर विषयांत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या पाल्यांच्या सभासदांनीच अर्ज करावेत.