HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये एन.पी.टी.ई.एल. जागरूकता कार्यशाळा

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये एन.पी.टी.ई.एल. जागरूकता कार्यशाळा

 कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी "एनपीटीईएल जागरूकता (NPTEL Awareness)" कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. 

 आयआयटी मुंबईचे प्रा. श्रीधर अय्यर यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच भारतातील सर्व आयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने "नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नोलॉजी एनहान्सड लर्निंग" म्हणजेच "एनपीटीईएल" या केंद्र शासनाच्या उपक्रमाची दोन दशकापूर्वी स्थापना झाली आहे. या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आणि भविष्यातील धोरणांची माहिती त्यांनी दिली. याचा लाभ सर्व अभियांत्रिकीमधील विविध विद्याशाखांचे शिक्षक आणि विद्यार्थी "ऑनलाईन शिक्षण व सर्टिफिकेट कोर्स" करण्यासाठी घेऊ शकतात.   

या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, एनपीटीईएल समन्वयक डॉ. कपिल कदम, संगणक विज्ञान विभागप्रमुख प्रा. राधिका ढणाल, डिन सीडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे व अध्यापक वर्ग यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.