विद्या मंदिर बनाचीवाडी येथे जागरूक पालक, सदृढ बालक अभियानाची सुरुवात

विद्या मंदिर बनाचीवाडी येथे जागरूक पालक, सदृढ बालक अभियानाची सुरुवात

विद्या मंदिर बनाचीवाडी येथे जागरूक पालक, सदृढ बालक अभियानाची सुरुवात

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे : ० ते १८ वयोगटातील बाल व किशोरवयीन मुला मुलींची आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय राधानगरी, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक, आशा सेवक, आणि अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने विद्या मंदिर बनाचीवाडी तालुका राधानगरी येथे जागरूक पालक सदृढ बालक अभियानाची सुरुवात करण्यात आली

              अभियानाचे उद्घाटन राधानगरीच्या सरपंच मा सविता राजाराम भाटळे यांच्या हस्ते तसेच बनाचीवाडी गावच्या सरपंच मा. प्राजक्ता जयवंत पताडे यांच्या अध्यक्षतेखाली  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.आनंदा शामराव पताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुलांशी मंत्रालयातून थेट संवाद साधला सर्व विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय राधानगरीचे डॉ.मुराद कुलकर्णी ,डॉ.मृणाल अमनगी ,डॉ.राजेंद्र इंगवले, डॉ. प्रतीक्षा एळगे आणि ग्रामीण रुग्णालय राधानगरीचे आरोग्य सेवक सेविका उपस्थित होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते, स्वागत बनाचीवाडी शाळेचे अध्यापक श्री सागर कांबळे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री प्रकाश कांनकेकर सर यांनी मानले.