मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर;विद्यमान आमदारांना पुन्हा संधी!

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. आज (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
अजित पवारांनी त्यांच्या गटातील सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत, ज्यामुळे या मतदारसंघातून दुसऱ्या कुणाला उमेदवारी मिळणार, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यादीतील काही महत्त्वाचे उमेदवार असे आहेत: कागल मधून हसन मुश्रीफ,चंदगड मधून राजेश पाटील, येवला मधून छगन भुजबळ, आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील, परळी मधून धनंजय मुंडे, श्रीवर्धन मधून आदिती तटकरे, पिंपरी मधून आण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे