मोठी बातमी!अजित पवार या मतदारसंघातून लढणार!

मोठी बातमी!अजित पवार या मतदारसंघातून लढणार!

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. आज (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली.

यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची बारामतीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता निश्चित झाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, या यादीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.