भाजपाचं ठरलं , महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'देवेंद्र'राज

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे सरकार स्थापन होणार हे नक्की झालं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालं नव्हतं. काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात चढाओढ सुरु होती. पण आता याला पूर्णविराम मिळाला आहे. आज भाजपच्या झालेल्या विधिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.
उद्या म्हणजेच ५ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ऐतिहासीक आझाद मैदानात हा शपथविधी पार पडणार असून भाजपाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर पंकजा मुंडे, दरेकर, चव्हाण यांनी याला अनुमोदन दिले. यावरून आता सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा आता देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी या आधीही राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा पाच वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा देवेंद्रराज येणार आहे. एकूणच आता देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सत्ता सांभाळणार आहेत.