समाज कल्याण विभागातर्फे उद्या दिव्यांग सांस्कृतिक सोहळा

समाज कल्याण विभागातर्फे उद्या दिव्यांग सांस्कृतिक सोहळा

कोल्हापूर प्रतिनिधी : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने उद्या मंगळवारी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्मशाळा मधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. श्री मंगल कार्यालय, बावडा-शिये रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी संजय शिंदे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सांगावकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) शिल्पा पाटील, कृषी अधिकारी सारिका वसगांवकर, शिक्षणाधिकारी (माध्य) एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मिना शेंडकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर आदी उपस्थित असणार आहेत. 

या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता दिव्यांग कल्याण साधना कांबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.