HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'या' कामाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा - भुदरगड भाजप शिष्टमंडळाची मागणी

'या' कामाची चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा - भुदरगड भाजप शिष्टमंडळाची मागणी

गारगोटी (प्रतिनिधी) - मिनचे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूचा येणाऱ्या उजव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या अस्तरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सदरचा उजवा कालवा एकाच महिन्यात दोन वेळा फुटलेला आहे. त्यामुळे या उजव्या कालव्याच्या अस्तरी करण्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे भुदरगड तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपूर्वी या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू होते. परवाच्या झालेल्या पावसामुळे सदरच्या कालव्यामध्ये पाण्याचा प्रचंड दाब वाढला पण या निकृष्ट असलेल्या अस्तरीकरणाच्या कामामुळे उजव्या कालव्याला प्रचंड मोठी भगदाड पडले यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रचंड नुकसान झालेले असून फक्त शासनाची आर्थिक लूट करायची या मानसिकतेतून उजव्या कालव्यावर देखरेख करणारे अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने निकृष्ट दर्जाचे काम करतात. त्याचा नाहक त्रास परिसरातील शेतकऱ्यांना होतो त्यामुळे या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामांमध्ये हेळसांड झाली असून यामध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमत करून हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे असा येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक उपअभियंता दूधगंगा उजवा कालवा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली नसल्यास या विषयाच्या बाबत जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे दाद मागावी लागेल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला आहे. 

या शिष्टमंडळात भाजपा तालुका अध्यक्ष संतोष पाटील, वसंत प्रभावळे, रणजित आडके, सुनिल तेली, विजय शिंदे, सचिन देसाई, पांडुरंग वायदंडे,मोहन सूर्यवंशी, अविनाश कवडे, अवधूत सुतार, यांच्यासह मिणचे पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.