विदेशी कला, संस्कृतीला समर्पित ‘कार्निव्हल-२०२५’चे आयोजन

विदेशी कला, संस्कृतीला समर्पित ‘कार्निव्हल-२०२५’चे आयोजन

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे ‘कार्निव्हल-२०२५’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाचे उद्या (दि. ५) आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते उद्या दुपारी १२.३० वाजता वि. स. खांडेकर भाषा भवन येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. 

‘कार्निव्हल-२०२५’ हा विदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा उत्सव विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. महोत्सवात रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज भाषेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या त्या-त्या देशांतील पारंपारिक कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन होईल. रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज संस्कृतीचा परिचय करून देणारी पुस्तके, शब्दकोश आणि बालसाहित्य देखील प्रदर्शित करण्यात येईल. स्नेहल शेट्ये, प्रियांका माळकर, ज्योती पाटील, गीतांजली शहा, स्नेहा वझे आणि ऐश्वर्या चव्हाण या महोत्सवाचे संयोजन करीत आहेत. या महोत्सवाला भेट देऊन विदेशी संस्कृतीचा परिचय करून घेण्याचे आवाहन विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे.