HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सहा वार, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर सहा वार, नेमकं काय घडलं?

मुंबई: सलमान खानच्या घरावर गोऴीबार झाल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये आणखी एक घटना घडली आहे.अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीकडुन त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लिलावती रुग्णालयाकडून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सैफवर सहा वार 

लिलावती रुग्णालयचे सीइओ डॉ. नीरज उत्तामनी यांनी सांगितलं की, सैफ अली खान यांच्यावर रात्री ३.३०च्या दरम्यान त्यांच्याच बांद्रे इथल्या घरात एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. या व्यक्तीनं सैफवर सहा वार केला. यातले दोन वार हे अतिशय खोल असे आहेत. एक वार मणक्याच्या जवळ करण्यात आलाय. त्याच्यावर डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करत आहेत. न्यरोसर्जन असलेले डॉ. नितीन डांगे, कोस्मेटीक सर्जन, डॉ. लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी ही टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

सैफ अली खानच्या बिल्डिंगची सुरक्षा वाढवली

सगळ्यात आधी पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांचे मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. यातील कोण अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात तर नव्हता ना, असा तपास सध्या पोलिस करत आहेत.पोलिसांनी सध्या सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या जवळ पोलिस सुरक्षा वाढवली आहे.

नेमकं काय घडलं ? 

रात्री ३.३० च्या सुमारास सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. चोरीच्या उद्देशानं तो घरात घुसल्याचं म्हटलं जात आहे. सगळ्यात आधी हा चोर सैफच्या मुलांच्या रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या नॅनीच्या हे लक्षात आल्यानंतर तिनं आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकल्यानंतर सैफ अली खाननं या चोराला पकडण्याचा प्रयक्न केला. पण या दोघांमध्ये झटापट झाली, या चोराकडे चाकू असल्यानं त्यानं सैफवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर त्या अज्ञात चोरानं तिथून पळ काढला. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.