'या' १४ वर्षीय मराठमोळ्या मुलीने मोडला स्मृती मानधनाचा रेकॉर्ड, झळकावले त्रिशतक
मुंबई : १४ वर्षीय मुंबईकर असणारी आयरा जाधव हिने अवघ्या जगाला लक्षात राहील अशी कामगिरी केली आहे.आयरा जाधवने महिला अंडर १९ वनडे ट्रॉफीमध्ये नवा इतिहास रचला. मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात आयरा जाधवने त्रिशतक झळकावून इतिहास रचला.
आयरा जाधवने १५७ चेंडूंचा सामना करत ३४६ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात ४२ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश होता. या काळात तिचा स्ट्राइक रेट २२० होता. ९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारी आयरा ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यादरम्यान आयराने स्मृती मानधना, राघवी बिश्त, जेमिमाह रॉड्रिग्स आणि सानिका चाळके यांना मागे सोडले. बेंगळुरूच्या अलूर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात आयराने मुंबईसाठी ३४६ धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधार हर्ले गालासह आयराने शतक झळकावले.
१५७ चेंडूत केल्या नाबाद ३४६ धावा
१५७ चेंडूंचा सामना करताना तिने ४२ चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीने नाबाद ३४६ धावा केल्या. तिच्याशिवाय कर्णधार हर्लेने ११६ धावांची खेळी खेळली, ज्यात १४ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे मुंबई संघाने ५० षटकांत ३ गडी गमावून ५६३ धावा केल्या. आयराने मेघालयविरुद्ध नाबाद ३४६ धावा केल्या आणि A19 ODI मध्ये त्रिशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने स्मृती मानधना (२०१३ मध्ये नाबाद २२४), राघवी बिश्त (नाबाद १२९), जेमिमाह रॉड्रिग्स (नाबाद २०२) आणि सानिका (२०० धावा) यांचे विक्रम मोडले.