रवी आवाडे यांची डीकेटीईच्या एक्झिकिटीव्ह डायरेक्टर पदी निवड

रवी आवाडे यांची डीकेटीईच्या एक्झिकिटीव्ह डायरेक्टर पदी निवड

इचलकरंजी प्रतिनिधी - डीकेटीई सोसायटीची स्थापना १९८२ मध्ये झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रात डीकेटीई ने नेहमी प्रगतीचा चढता आलेख ठेवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकीक जागतिक पातळीवर होत आहे. या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या गर्व्हर्निंग कौन्सिल मिटींगमध्ये डीकेटीई सोसायटीच्या एक्झिकिटीव्ह डायरेक्टर पदी रवी आवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

रवी आवाडे हे इंजिनिअर असून, त्यांनी एमबीए ही पदवी संपादन केलेेली आहे. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात असणारा त्यांचा अनुभव व कार्यपध्दती, आंतरराष्ट्रीय स्तरावर इन्स्टिटयूट व इंडस्ट्रीजशी असलेले त्यांचे हितसंबध, शैक्षणिक कार्य आणि त्यांच्या संकल्पनेतून डीकेटीईमध्ये उदयास आलेला स्टार्टअप कटटा या माध्यमातून इन्व्होशेन व स्टार्टअप मध्ये संस्थेने घेतलेली भरारी व ऍलेन या देशातील अग्रेसर कोचिंग इन्स्टिटयूट बरोबर केलेला करार अशा सर्व बाबींचा विचार करुन त्यांची डीकेटीईच्या एक्झिकिटीव्ह डायरेक्टर पदी निवड करण्यात आली आहे.

 डीकेटीई मार्फत स्टार्टअप व इन्व्होशेन यामध्ये ए.आय. चा आधुनिक तंत्रज्ञान निर्मितीसाठी रवी हे प्रयत्नशील राहतील असे उदगार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी या निवडीवेळी काढले. डीकेटीईचे एक्झिकिटीव्ह डायरेक्टर म्हणून रवी आवाडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करीत असताना सर्वांच्या सहकार्याने संस्थेला प्रगती पथावर नेवू असा विश्‍वास व्यक्त केला.

निवडीबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, व सर्व ट्रस्टींनी रवी आवाडे यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ एल.एस.आडमुठे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.