HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार ? ; 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार ? ; 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुणे : कॉँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर कॉँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पुणे काँग्रेसच्या निरीक्षक पदावर डावलल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारं स्टेटस शेअर केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना पेव फुटला आहे. 

"तू वाली है, तू महेरमन है, निगहमान है, तू ही" हे बोल असलेलं नव्या अग्निपथ चित्रपटातील ऋषी कपूर यांचं 'शाह का रुतबा' गाणं स्टेटसला ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचक इशारा दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.  

नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आलेल्या रवींद्र धंगेकर यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. रवींद्र धंगेकर काँग्रेसची साथ सोडून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

काय आहे धंगेकरांचं स्टेटस?

"तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी, तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही" हे गाणं स्टेटसवर ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी नेमका कोणाला इशारा दिला, याची चर्चा आहे. नुकतीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पुणे शहर काँग्रेसमध्येही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून धंगेकरांना स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

कसबा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रवींद्र धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, अशा चर्चा होत्या. मात्र या चर्चा फेटाळत रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.