राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेच्या अध्यक्षपदी पाटील; उपाध्यक्षपदी आयरे

राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेच्या अध्यक्षपदी पाटील; उपाध्यक्षपदी आयरे

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील व उपाध्यक्षपदी अरविंद आयरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सहायक निबंधक प्रेरणा शिवदास होते.

पाटील यांचे नाव रोहित बांदिवडेकर यांनी सुचविले. त्यास रवींद्र पंदारे यांनी अनुमोदन दिले. शशिकांत तिवले यांनी उपाध्यक्ष पदासाठी अरविंद आयरे यांचे नाव सुचविले. त्यास रमेश घाटगे यांनी अनुमोदन दिले. सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून बँक प्रगतीपथावर नेऊ, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष पाटील यांनी दिली. बैठकीस संचालक अतुल जाधव, विलास कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, हेमा पाटील, मनुजा रेणके, संजय खोत, किशोर पोवार, प्रकाश पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.