पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 शुक्रवार, दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता सेनापती कापशी ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक कामाची आढावा बैठक. स्थळ: कागल, ता. कागल) सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती समवेत बैठक. (स्थळ: तहसिलदार कार्यालय, कागल) दुपारी 1 ते सायं. 6 वाजेपर्यंत राखीव. सायं. 6 वाजता बामणी ता. कागल येथील इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम. (स्थळ: बामणी, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)

  शनिवार, दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता शिक्षण विभाग पंचायत समिती, कागल यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थीनी यांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रम. (स्थळ: मटकरी हॉल, कागल) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कागल दौऱ्याच्या नियोजनसंबंधी बैठक. (स्थळ: शाहू हॉल ता. कागल) सायं. 5 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: श्रीमंत बापूसाहेब महाराज चौक, कागल, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)

          रविवार, दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 ते 12 वाजता गडहिंग्लज ता. गडहिंग्लज येथे पक्षाच्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी. (स्थळ: पक्ष कार्यालय, गडहिंग्लज) दुपारी 12 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, कागल) दुपारी 1 ते 6 वाजता राखीव. सायं. 6 वाजता साके ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप. (स्थळ: साके, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)

       सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता जनता दरबार. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) दुपारी 2 ते सायं. 7 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.