HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

समरजितसिंह घाटगे यांचा 3 सप्टेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश

समरजितसिंह घाटगे यांचा 3 सप्टेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश

कागल (प्रतिनिधी) :  कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात मंगळवार 3 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा भव्य मेळावा संपन्न होत आहे.या मेळाव्यास पक्षाध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

  विशेष म्हणजे याच मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजे समरजीतसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश होणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील व तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, मा. खासदार शरदचंद्रजी पवार या 84 वर्षाच्या तरुण योद्धाच्या स्वागतासाठी कागल नगरी सज्ज झाली असून, मेळाव्यास राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर के पवार, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, महिला शहराध्यक्ष पद्मजा तीवले, कार्याध्यक्ष अनिल घाटगे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल तालुका महिला अध्यक्षा सौ. अश्विनी अरुण व्हरांबळे यांच्यासह राजे प्रवीणसिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. पवार यांची कागल मध्ये ही पहिली सभा होत असून, राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची उत्सुकता, यामुळे सभेस मोठी गर्दी होईल असा अंदाज बांधला जात आहे.

मुख्य रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून वाहनाची पार्किंग व्यवस्था निपाणी वेस,यशवंत किल्ला, शिक्षण संकुल,पटांगण,येथे करण्यात आली आहे. तरी या ऐतिहासिक मेळाव्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.