HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध

राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध

कागल प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकामध्ये अग्रगण्य असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ या बँकेची निवडणूक बिनविरोध करत आपली सहकारातील मुत्सद्देगीरी दर्शविली. १०८ वर्षापुर्वी कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ पतपेढी म्हणून स्थापना होऊन १९८६ साली बँकेत रुपांतर झालेल्या या संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली. त्यामुळे बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

निवडून द्यावयाच्या सतरा जागांसाठी सतरा जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने हे सर्वजण बिनविरोध निवडू आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. समीर जांबोटकर यांनी जाहिर केले. ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करताच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांची नांवे अशी. कंसात गावाचे नांव : नवोदिता समरजितसिंह घाटगे (शिंदेवाडी), मारुती पांडूरंग पाटील (बामणी), दत्तात्रय तुकाराम खराडे (शिंदेवाडी), संजय यशवंत पाटील (बेलवळे बुद्रुक), रविंद्र खंडेराव घोरपडे (मा‌द्याळ), रणजीत शिवगोंडा पाटील (कागल), दिपक कुंडलिक मगर (कागल), सुशांत सुभाष कालेकर (कागल), संजय गुरुदास चौगुले (हमीदवाडा), प्रकाश कृष्णाजी पाटील (करड्‌याळ), अमर धोंडीराम चौगले (मुरगूड), अमोल मलगोंडा शिवई (सुळकूड), कु-हाडे-वड्ड प्रविण आण्णासो (कागल), नम्रता विवेक कुलकर्णी (कागल), उमेश आनंदा सावंत (कागल), अरुण अशोक गुरव (कागल), राघू यशवंत हजारे (सिद्धनेर्ली)

हा तर स्व. राजेसाहेबांच्या सहकारातून समृ‌द्धीच्या शिकवणीचा गौरव-समरजितसिंह घाटगे

शाहू साखर कारखान्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात राजे बँकेची सलग 5 वी निवडणूक बिनविरोध करून स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या सहकारातून समृद्धीच्या शिकवणीचा सभासदांनी गौरव केला आहे. त्याबद्दल सन्माननिय सभासदांसह ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या व सहकार्य केलेल्या सर्वच घटकांचे मी मनापासून आभार मानतो. एक हजार कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीकडे वाटचाल असलेल्या बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या उत्कर्षासाठी यापुढेही पारदर्शकपणे, विश्वासाने व आणखी जोमाने काम करु.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.