HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पेठवडगांव परिसरातील 'पैलवान गॅग' एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातून हद्दपार

पेठवडगांव परिसरातील 'पैलवान गॅग' एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातून हद्दपार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हिताला बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.

अवैध गुन्हयांना परिणाम देणा-या पेठवडगांव परिसरातील कुख्यात असलेल्या "पैलवान गँग" या संघटीत गुन्हेगारी टोळीचा टोळी प्रमुख, प्रविण वावु माने वय ३०, अजिंक्य उर्फ अक्षय अशोक माने वय ३७, विशाल विनायक माने वय २९, विश्वजीत अशोक माने वय २२, दिपक वसंत माने वय ४१, धनाजी शंकर माने वय ३३, अजित वसंत माने वय ३७, सागर राजेंद्र खोत वय २१, अमर उर्फ राहित सुरेश वडर वय २५, सुरज नेताजी जाधव वय ३३ सर्व रा. पेठवडगांव यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीच्या परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक, वडगांव पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीच प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी सारे यांच्याकडे सादर केला होता.

कोल्हापूर जिल्हयाचे हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांनी सदरच्या प्रस्तावांची निः पक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी विभाग यांची नियुक्ती केली होती. त्यानी चौकशीअंती अहवाल हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष वेळावेळी घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले.

सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक योगेश कुमार सारे यांनी टोळीच्या प्रमुखासह १० इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एक वर्षाचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक, वडगांव पोलीस ठाणे यांनी पारित केलेल्या आदेशाची बजावणी करुन त्यांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन घालवुन दिले आहे.

हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्ष ०२३१ - २६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.