जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतर

जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतर
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतर

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 


जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान राधानगरी 90 टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. 


त्या अनुषंगाने २०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात पूराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतरण प्रक्रिया सुरु केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरबाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आवाहन केले आहे.