राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरासह जिल्यात पावसाने थोडी उघडीप घेतली होती, मात्र, धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरण 100% भरले होते आज दि. 31/7/2024 सकाळी 11.25 वा.राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 1 बंद झाला. तर दुपारी 1.10 वा.राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 2 बंद झाला आहे. धरणाची एकूण पाच ( क्र.3,4,5,6,व 7 ) द्वारे उघडली आहेत. विसर्ग - द्वार क्र.3,4,5,6 व 7 मधून 7140 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 8640 cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.