राहुल पी. एन. पाटील यांना धैर्यशील पाटील - कौलवकर गटाचा पाठिंबा

करवीर (प्रतिनिधी): राहुल पाटील यांच्या विजयासाठी धैर्यशील पाटील गटाचे समर्थक राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. करवीरच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे राहुल पाटील यांना विजयी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी वाशी तालुका करवीर येथे राहुल पाटील यांना धैर्यशील पाटील कौलवकर गटाच्या करवीर तालुक्यातील २४ गावातील कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानिमित्त बोलावलेल्या बैठकीत केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
धैर्यशील पाटील म्हणाले आपला पाठिंबा हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून राहुल पाटील यांच्या विजयासाठी लवकर गटाचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील. कौलवकर गटाचा पाठिंबा हा मताधिक्य वाढवणारे ठरेल.
रवींद्र पाटील सडोलीकर म्हणाले, कौलवकर गटांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर राहुल पाटील यांचा विजय निश्चित आहे पैशाच्या आमिषाला बळी न पडता निष्ठावान कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांना पी एन पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ द्यावे.
भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील म्हणाले धैर्यशील पाटील गटाचा पाठिंबा विजयावर शिक्कामोर्तब करणार आहे भोगावती टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत विधानसभेचे निवडणुकीत राधानगरी व करवीर मध्ये समन्वयाने काम करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे साहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहुल पाटील यांना साथ द्या.
प्रास्ताविक व स्वागत दादासाहेब पाटील कौलकर ट्रस्टचे अध्यक्ष निवास पाटील यांनी केले निवास पाटील म्हणाले कौलवकर गटाची ताकद करवीर मतदारसंघ निर्णायक असून कौलवकर गट जिकडे असेल तिकडे विजय होतो असे समीकरण आहे यामुळे राहुल पाटील यांना पाठबळ मिळेल.
यावेळी बी टी आमते, सुनील पाटील कुरुकली , बी ए पाटील वाशी , उदयानी साळुंखे सरकार यांची भाषणे झाली.
मेळाव्यास कौलवकर गटाचे यशवंत पाटील परिते. शंकरराव पाटील कांचनवाडी. आप्पासाहेब हजारे दत्ता हजारे वाशी, बी एन पाटील सोनाळी, हरिदास मोहिते आरे, साताप्पा पाटील बेले, शहाजी पाटील महाळुंगे,
वसंतराव पाटील कुरुकली रघुनाथ मिटारी भगवान देवकर गाडेगोंडवाडी, सर्जेराव पाटील हळदी, धनाजी पाटील पाटेकर वाडी, रघुनाथ पाटील बाचणी, आशुतोष पाटील परिते, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते भोगावती साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.