रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी विशाल जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी: रुग्ण हक्क संघर्ष समिती प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण हक्कच्या पुणे शहर कार्यालयात पुणे जिल्ह्याध्यक्ष रवी गजे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी विशाल जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी महिला प्रमुख मिनाक्षी शेटे, संस्थापक सचिव विश्वासजी कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय सुरवसे, सह सचिव संतोष सोनवणे, पुणे संघटक किरण बडे, महिला जिल्हाध्यक्षा मंगल जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा माधुरी कोलते, उपाध्यक्षा किरण पाचपांडे, पुणे शहराध्यक्ष संजय बावळेकर, गायत्री देभे, कल्पना जाधव, मनिषा आगळे , राहुल ताटे, विशाल जाधव, शशांक घाडगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.