रुपयाच्या अवमूल्यानंतर मनमोहन सिंग यांनी स्वतःची ज्यादाची रक्कम केली सरकार जमा

रुपयाच्या अवमूल्यानंतर मनमोहन सिंग यांनी स्वतःची ज्यादाची रक्कम केली सरकार जमा

मुंबई : देशावरील आर्थिक संकट टाळण्यासाठी जुलै १९९१ मध्ये भारतीय चलनाचे अवमूल्यन  करण्यात आले. त्यावेळी मनमोहन सिंग तत्कालीन पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री  होते. या दरम्यान  त्यांचे परदेशात एक खाते होते, ज्यात त्यांची परदेशात काम करतानाची कमाई जमा करण्यात आली होती. अवमूल्यन म्हणजे प्रत्येक यूएस डॉलर किंवा इतर कोणतेही विदेशी चलन आणि विदेशी मालमत्तेला भारतीय रुपयात रूपांतरित केल्यावर अधिक मूल्य मिळेल. सरकारच्या निर्णयानंतर परदेशातील खात्यातील त्यांच्या पैशांचे मूल्य रुपयाच्या तुलनेत वाढले पण, अशा स्थितीत स्वतः लाभ घेण्याऐवजी त्यांनी ती वाढीव रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत धनादेश जमा केला. 

 पीव्ही नरसिंह राव सरकारने रुपयाचे दोन वेळा ९ टक्के  आणि ११ टक्के असे दोनवेळा अवमूल्यन केले. सण  १९९१ ते १९९४ या काळात पंतप्रधान कार्यालयात काम केलेले आय. एफ. एस. अधिकारी दामोदरन म्हणाले की, 'डॉ. सिंग यांनी शहाणपणाचे पाऊल उचलले. डॉ. सिंग यांनी याची प्रसिद्धी  जराही केली नाही.  त्यांनी शांतपणे त्या रक्कमेचा धनादेश  सरकार जमा केला. मला खात्री आहे की त्यांनी पंतप्रधानांना याबद्दल नंतर सांगितले असेल पण त्यांनी याबद्दल कधीच मोठी चर्चा केली नाही.'