मनमोहन सिंग यांनी राजकारणात पाळलेले तत्त्व, अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

मनमोहन सिंग यांनी राजकारणात पाळलेले  तत्त्व, अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि.26) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज राजधानी दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. 

मनमोहन सिंग यांनी राजकारणात पाळलेल्या तत्त्वाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या घटनेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक वर्षांपूर्वी 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात अजित दादांनी मुलाखतीत सांगितलेला हा किस्सा, आता मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा  चर्चेत आला आहे.

अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो...

ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेच्या उपनेतेपदावर असतानाच भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो, असं म्हणत मुंडेंचा संभाव्य काँग्रेस प्रवेश मनमोहन सिंग यांनी रोखला होता. या घटनेवरुन त्यांनी राजकारणात आपल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप सोडल्याचे दिसून येते.