HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शितल फराकटे यांचे प्रसिद्धीपत्रक -आमचा प्रयत्न पूर्णसत्य बाहेर येण्यासाठीच

शितल फराकटे यांचे प्रसिद्धीपत्रक -आमचा प्रयत्न पूर्णसत्य बाहेर येण्यासाठीच

कोल्हापूर प्रतिनिधी: नवोदिता घाटगे यांनी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अर्धसत्यच बाहेर आल्याचे सांगत आहेत. त्यामुळेच आमचा प्रयत्न पूर्णसत्य बाहेर येण्यासाठीच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जोपर्यंत आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत आणि नवोदिता घाटगे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. लवकरात लवकर योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास प्रसंगी सर्वपक्षीय महिलांचा मोर्चाही काढू, असा इशारा फराकटे यांनी पत्रकात दिला आहे.

 या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, घाटगे वहिनी यांना आमचा पहिलाच प्रश्न आहे की, त्यांचे पती समरजीत घाटगे यांचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत.  मग पैशाच्या मागणीचा फोन आल्या-आल्या त्यांच्या कानावर का घातले नाही आणि तसा गुन्हा का दाखल केला नाही? २० लाख रुपये दिल्यानंतर पोलिसात जाऊन तुम्हीच फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा विषय जनतेसमोर आल्यावर चर्चा तर होणारच. या विषयात तुम्ही एवढे भाऊक आणि हळवे होण्याची काही गरज नाही.             

तक्रार दाखल होऊन तीन आठवडे होत आले. तरीही पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या का आवळल्या नाहीत. या प्रकरणाचा पूर्ण आणि सखोल तपास होऊन पूर्णसत्य बाहेर येईपर्यंत आणि तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणारच आहोत. येत्या आठवड्याभरात या प्रकरणी कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्वपक्षीय महिला मोर्चाही काढणार आहोत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.