वारणा विद्यापीठ व टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार
वारणानगर (प्रतिनिधी) : वारणा विद्यापीठ व टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये मलेशियामध्ये सामंजस्य करार झाला. या करारावर वारणा विद्यापीठाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी,वारणा विद्यापीठाचे रिसर्च इनोवेशन अँड पार्टनरशिप चे डायरेक्टर, डॉ. उमेश देशन्नवार व टेलर्स युनिव्हर्सिटी कडून टेलर युनिव्हर्सिटीचे कार्यकारी प्राध्यापक डॉ. डेव्हिड असिर्वथम व अभियांत्रिकी प्रमुख,प्राध्यापक डॉ. सिम यी वाई, यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी प्रोफेसर डॉ. सायन रे, हेड स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, फॅकल्टी ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी, डॉ. प्रवीना उपस्थित होते.
वारणा विद्यापीठामधून डॉ. विलास व्ही. कारजिन्नी व डॉ. उमेश देशन्नवार खास करून सामंजस्य करण्यासाठी मलेशियात उपस्थित होते. या कराराच्या यशस्वीतेबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या सामंजस्य करारामुळे वारणा विद्यापीठ व टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये संशोधन सहयोग,विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण, शैक्षणिक देवाणघेवाण (चर्चा, मंच, व्याख्याने इ.), पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पर्यवेक्षण, इतर कोणतेही शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.टेलर्स युनिव्हर्सिटी, मलेशिया आणि आग्नेय आशियातील सर्वोच्च खाजगी विद्यापीठात व जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी 5 स्टार रेट केलेल्या काही आशियाई विद्यापीठांपैकी एक असुन विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण उपलब्ध करून देतो. तर वारणा विद्यापीठ महाराष्ट्राच्या नवीन धोरणानुसार मान्यता मिळालेले राज्यातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ आहे.