HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

गोखले कॉलेजमध्ये स्वप्नवेल व संजीवन कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न

गोखले कॉलेजमध्ये स्वप्नवेल व संजीवन कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात उपप्राचार्य एन.टी.पाटील (प्रा. मोहन पाटील) लिखीत "स्वप्नवेल" व प्रा.एम.एम. कांबळे (राजू पुणेकर) लिखीत "संजीवन" कविता संग्रहाचे प्रकाशन दै. सकाळचे संपादक निखिल पंडितराव व शिवाजी विद्यापीठातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक श्रीराम मोहिते यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा.डॉ. मंजिरी मोरे या होत्या.

स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कौन्सिल सदस्य प्रा.पी.बी झावरे यांनी करुन दिला.

 निखिल पंडितराव यांनी बोलताना स्वप्नवेल या कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रा. पाटील यांनी निसर्ग, पर्यावरण, प्रेमभावना, नात्यातील गुंफण जगण सशक्त पणे कवितांच्या माध्यमातून मांडले आहे ही बाब कौतुकास्पद असून संजीवन कविता संग्रहाच्या माध्यमातून प्रा. कांबळे यांनी जगणं, ग्रामीण व्यवस्था विद्रोही विचार मांडले असून ही बाब जळपणे दिसून येते.

प्रा. श्रीराम मोहिते यांनी कवितेच्या माध्यमातून जगण्याचे प्रश्न मांडून प्रबोधन व विचारांचा वारसा, नवनिर्मितीची संकल्पना, नैसर्गिक जीवन व संवेदना त्याच बरोबर पर्यावरण वाचवा हा संदेश या कवितांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात जागृती करतील असे मत याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. मंजिरी मोरे यांनी दोन्ही कविता संग्रहाच्या माध्यमातून पर्यावरण, नाती, निसर्ग, आदि गोष्टी रसिकांच्या मध्ये जागृती निर्माण करतील असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलत देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, मा. अजित मोरे, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

यावेळी प्रा.पी.बी. झावरे, पर्यवेक्षक प्रा.एस.एन.मोरे, प्रा.आर.बी. सुतार, प्रा.श्रीम.एम.एल. धनवडे, प्रा.आर.जी. तावरे, प्रा.एस.एन. कुरणे, तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.ए.यु.पडवळ व प्रा.एस.ए. कांबळे यांनी केले. आभार प्रा.वाय.डी.पाटील यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.