काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आज (२६ ऑक्टोबर) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, ज्यात २३ उमेदवारांचा समावेश आहे.
याआधी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ४८ उमेदवार होते. महाविकास आघाडीतील जागावाटपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील अन्य नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर झाली आहे.
कोणत्या २३ उमेदवारांची घोषणा? वाचा यादी!
मतदारसंघाचे नाव उमेदवार
१ भुसावळ राजेश मानवतकर
२ जळगाव जामोद स्वाती वाकेकर
३ अकोट महेश गणगणे
४ वर्धा शेखर शेंडे
५ सावनेर अनुजा केदार
६ नागपूर दक्षिण गिरिश पांडव
७ कामठी सुरेश भोयर
८ भंडारा पुजा तवेकर
९ अर्जुनी मोरगाव दिलीप बनसोड
१० आमगाव राजकुमार पुरम
११ राळेगाव वसंत पुरके
१२ यवतमाळ अनिल मांगुलकर
१३ अर्णी जितेंद्र मोघे
१४ उमरखेड साहेबराव कांबळे
१५ जालना कैलास गोरंट्याल
१६ औरंगाबाद पूर्व मधुकर देशमुख
१७ वसई विजय पाटील
१८ कांदिवली पूर्व कालू भडेलिया
१९ सायन कोळीवाडा गणेश कुमार यादव
२० श्रीरामपुर हेमंत ओघले
२१ निलंगा अभय कुमार साळुंके
२२ चारकोप यशवंत सिंह
२३ शिरोळ गणपतराव पाटील