शिवाजी विद्यापिठातील मेस च्या जेवणात अळ्या; संबंधितांवर कारवाई करण्याची शिवसेना युवासेनेची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात विद्यापीठातील, वस्तीगृह क्रमांक 1 मधे जेवणात आळ्या आढळून आळ्या होत्या. यानंतर विद्यापिठाने तात्काळ दखल घेत याच्यावर चौकशी समिती नेमली. मात्र पुन्हा शनिवारी विद्यार्थी वस्तीग्रह क्रमांक 3 च्या मेस मध्ये डाळीच्या आमटीत अळ्या सापडल्या आहेत. अन् हा प्रकार अत्यंत गंभीर असून, ज्या जेवणात अळी सापडली,त्या अन्नाचे टेस्टिंग करावे,तसेच ज्या दोन मेस मध्ये हा प्रकार घडला,त्या मेस मध्ये जेवणाची जबाबदारी असणाऱ्यांवर चौकशी करावी, तेथील रेक्टर ची चौकशी करावी आणि यात दोषी
आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन आज कोल्हापूर युवासेनेचे पदाधिकारी यांनी शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डी, टी शिर्के यांना दिले. या मागणीची दखल न घेतल्यास विद्यापीठात एकाही अधिकाऱ्याला फिरकू देणार नाही असा इशारा शिवसेना युवा सेनेच्या वतीने देण्यात आलं.
यावेळी युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने,शहर समन्व्यक चैतन्य देशपांडे, शहर चिटणीस अक्षय घाटगे, उपशहर युवा अधिकारी किर्तीकुमार जाधव, अभिषेक दाबाडे, सिद्धेश नाईक,सागर कुंभार,युवतीसेनेच्या राजेश्री मिणचेकर, सानिका दामूगडे, माधुरी जाधव, युवासेना विभाग युवा अधिकारी शुभम पाटील,संकेत गुरव, तालुका प्रमुख दिग्विजय खडके, मुक्सीद सनदि,देवराज तोडकर,ओंकार अतिगरे आदी उपस्थित होते.