HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विशाळगडावर‌ जवानांच्या सलामीने फडकला तिरंगा

विशाळगडावर‌ जवानांच्या सलामीने फडकला तिरंगा

आंबा / प्रतिनिधी
 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील मुंडा दरवाजा येथे ध्वजारोहण सैन्य दलातील जवानांच्या संचलनात झाले. मंडल अधिकारी संभाजी शिंदे यांनी ध्वजारोहण केले. नाईक नंदकुमार खराटे यांनी शपथ दिली.


प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र लाड यांनी केले. शिवाजी तरूण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले व मैत्रेय प्रतिष्ठानचे यशपाल सुतार यांनी मनोगत मांडले.उपसरपंच पुनम जंगम, ग्रामपंचायत सदस्य मनोज भोसले,मुख्याध्यापक निलेश कुंभार, सैय्यद‌ मुजावर, यासिन मुजावर,दस्तगिर मुजावर, निलेश हर्डीकर,तलाठी जे.एम.स्वामी, राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते.आभार प्रविण कदम यांनी मानले. सुभेदार हितेश पार्टे म्हणाले,स्वराज्याच्या उभारणीत गडकोटांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.येथील ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय प्रेरणास्थान आहे. येथील भूमातेला वंदन करून तिच्या गौरवार्थ अभिमान व्यक्त केला.

जिल्ह्यात पाच गडावर तर देशात पंच्याहत्तर गडावर सैन्य दलाच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.कोल्हापूरात विशाळगडसह,पन्हाळा,सामानगड, महिपाल गड,रांगणा.या गडांची निवड केली होती.मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर आडके यांचे नियोजनात योगदान राहीले.


दरम्यान येथील प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सैय्यद मुजावर यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य मनोज भोसले व मुख्याध्यापक निलेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.